25 February 2021

News Flash

बोटिंगला गेलेली अभिनेत्री झाली गायब; आठवडाभरापासून पोलीस करतायत चौकशी

तलावात फिरण्यासाठी गेलेली अभिनेत्री झाली एकाएकी गायब

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरा बोटिंगला गेली असता गायब झाली आहे. ती ९ जुलै रोजी गुरुवारी सकाळी कॅलिफोर्नियातील पीरु तलावात बोटिंगसाठी गेली होती. मात्र या तलावात फिरताना ती गायब झाली आहे. या प्रकरणातील चकित करणारी बाब म्हणजे बोटिंग करताना तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगा देखील होता. तिचा मुलगा बोटीमधून किनाऱ्यावर परतला मात्र नाया गायब झाली आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

अवश्य पाहा – ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन

पोलीस या चकित करणाऱ्या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी स्कूबा एक्सपर्ट आणि हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने संपूर्ण तलावात तपासणी केली. परंतु त्यांना नायाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान त्यांनी नायाच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आई गायब झाल्यामुळे त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. परिणामी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “नाया रिवेराला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही स्कूबा एक्सपर्ट आणि हॅलिकॉप्टर्सच्या साहाय्याने तिचा शोध घेत आहोत. तसेच अंडर वॉटर कॅमेरांच्या साहाय्याने सध्या तपासणी सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की लवकरच आम्ही या प्रकरणात यशस्वी होऊ.” नायाच्या एकाएकी गायब झाल्यामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 2:32 pm

Web Title: naya rivera missing from piru lake during boating mppg 94
Next Stories
1 करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण
2 सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन
3 “यांना खरंच नेता म्हणायचं का?”; दिग्दर्शकाने साधला राजस्थानमधील घडामोडींवर निशाणा
Just Now!
X