News Flash

भारती सिंहच्या अटकेनंतर कपिल शर्मावरून मीम्स व्हायरल

भारतीच्या अटकेनंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया काय असेल यावरून मीम्स व्हायरल होत आहेत.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी छापा घातला. भारती सिंहच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी भारती हिचा पती हर्ष लिंबाचिया यालासुद्ध अटक करण्यात आली आहे. भारतीच्या अटकेनंतर कॉमेडियन कपिल शर्मावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. भारती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भूमिका साकारत होती.

भारतीच्या अटकेनंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया काय असेल यावरून मीम्स व्हायरल होत आहेत.

काय आहे प्रकरण?

एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला. कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारतीचे नाव समोर आले.

त्यानंतर अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील भारतीच्या घरी आणि निर्मिती कार्यालयात एनसीबीने छापा घातला. या वेळी ८६.५ गॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष या दोघांनी गांजाचे सेवत करत असल्याचं कबूल केल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 8:50 am

Web Title: ncb arrests comedian bharti singh cannabis recovered from her place memes on kapil sharma viral ssv 92
Next Stories
1 चित्ररंजन : नशिबाचे गरगरते फासे
2 सुखद अनुभव
3 लोककलावंतांचे दशावतार
Just Now!
X