News Flash

नीतू कपूर यांनी शेअर केला ऋषी कपूर यांच्या सोबतचा पहिला डान्स व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील मोस्ट आयकॉनिक कपल म्हणून आजही अभिनेत्री नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. ऋषी कपूर यांना जाऊन आता अनेक महिने उलटले आहेत. नीतू कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करताना दिसतात. नुकताच नीतू कपूर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नीतू कपूर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ऋषी कपूर आणि नीतू कपूर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हे गाण १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिंदा दिल’ या चित्रपटातील आहे. ‘शाम सुहानी’ असे या गाण्याचं नाव आहे. “आमच्या दोघांचा पहिला डान्स” असे कॅप्शन नीतू यांनी हा व्हिडीओ शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्याच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

२२ जानेवारी रोजी ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नाला ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशी देखील नीतू यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर आणि नीतू यांच्या चित्रपटांतील काही सीन आणि खऱ्या आयुष्यातील काही फोटो होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:03 pm

Web Title: neetu kapoor shared first dance video of her and rishi kapoor dcp 98 avb 95
Next Stories
1 संजय जाधव दुनियादारी करायला सज्ज; ‘या’ मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण
2 किंग खानने केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहुन तुमच्याही अंगावर येईल काटा
3 ‘तांडव’च्या वादावर शर्मिला टागोर यांनी सैफला दिला ‘हा’ सल्ला
Just Now!
X