19 September 2020

News Flash

नेहा धुपियाच्या खासगी विनंतीला अभिषेक बच्चनचा जाहिर नकार; म्हणाला…

अभिषेक बच्चनने नेहा धुपियाच्या शोमध्ये जाण्यास दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या सिनेसृष्टीत कार्यरत नसली तरी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमुळे मात्र ती कायम चर्चेत असते. सध्या तिचा ‘नो फिल्टर नेहा’ नावाचा एक शो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या शोमार्फत ती बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेते. या ट्रेंडिंग शोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याने हजेरी लावण्यास नकार दिला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे शोमध्ये येण्यासाठी नेहाने त्याला खासगीमध्ये विचारलं होतं. परंतु अभिषेकने तिला सोशल मीडियाद्वारे नकार दिला आहे.

अवश्य पाहा – “त्यावेळी मी ड्रग्सचं व्यसन करत होते”; कंगना रणौतचा व्हिडीओ व्हायरल

अवश्य पाहा – उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगनावर फराह खान संतापली, म्हणाली…

एका ट्विटर युजरने नेहाच्या शोमध्ये अभिषेकने यावं अशी विनंती केली होती. प्रेक्षकांच्या या विनंतीची नोंद घेत नेहाने अभिषेकला तिच्या शोमध्ये येऊन मुलाखत देण्याची विनंती केली होती. खरं तर ही विनंती तिने खासगीमध्ये केली होती. परंतु अभिषेक बच्चनने मात्र जाहिररित्या तिला नकार दिला आहे. “हाजिर जवाबी आणि नो फिल्टर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कृपया मला माफ करा.” अशा आशयाचं ट्विट करुन अभिषेकने नेहाला नकार दिला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 2:29 pm

Web Title: neha dhupia abhishek bachchan no filter neha mppg 94
Next Stories
1 शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात हा अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका?
2 No Woman No Crime; स्त्री अत्याचारांविरोधात अभिनेत्रीने उठवला आवाज
3 Viral Video: ‘बोले चुडिया’चा इंडोनेशियन रीमेक पाहिलात का?
Just Now!
X