22 October 2020

News Flash

अंगदबरोबर असलेली महिला आहे तरी कोण? नेहा झाली चिंतातूर

अंगदचा फोटो पाहून नेहाने व्यक्त केली चिंता

सडेतोड आणि रोखठोक बोलण्याच्या पद्धतीमुळे अभिनेत्री नेहा धुपिया कायमच चर्चेत असते. सध्या नेहा तिच्या पतीसोबत म्हणजे अंगद बेदीसोबत तिचा क्वालिटी टाइम व्यतीत करत आहे. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोडी सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. मात्र, मालदिवला गेल्यानंतर नेहाला अंगदविषयी एक चिंता सातत्याने सतावत आहे. याविषयी ती सोशल मीडियावर व्यक्तदेखील झाली आहे.

नेहाने इन्स्टाग्रामवर अंगदचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंगदसोबत बिकिनी घातलेली एक स्त्री दिसून येत आहे. यात त्या महिलेने हॅटच्या (टोपी) सहाय्याने तिचा चेहरा लपवला आहे. विशेष म्हणजे नेहाने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच नेहाने या फोटोला दिलेलं कॅप्शनदेखील अनेकांचं लक्ष वेधत आहे.


खरं तर नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अंगदसोबत उभी असलेली महिला दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द नेहाच आहे. तिने सहज मस्तीच्या मुडमध्ये हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, “मालदिवमध्ये काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या स्त्रीसोबत अंगदला पाहण्यात आलं आहे. या स्त्रीने तिचा चेहरा लपवला आहे. मी खरंच काळजी केली पाहिजे का?”, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, नेहान सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकदा तिचे विचार, मत उघडपणे व्यक्त करत असते. सध्या नेहाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, अनेक रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नो फिल्टर नेहा हा तिचा टॉक शो असून याव्यतिरिक्त ती एमटीव्ही रोडिज या कार्यक्रमातही झळकत असल्याचं पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 11:34 am

Web Title: neha dhupia and angad bedi in a maldives state of mind share stunning pics from vacation dcp 98 ssj 93
Next Stories
1 अनुरागच्या वर्तनाविषयी इरफान पठाणला सांगितलं होतं, पायलचा आणखी एक खुलासा
2 ‘धर्मांधता व अज्ञान कायमच सोबत राहतात’; शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी जिशान अय्यूबनं व्यक्त केली खंत
3 नऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट
Just Now!
X