05 December 2020

News Flash

Photos : नेहा कक्करची लगीनघाई; मेहंदी व हळदीचे फोटो व्हायरल

रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंह याच्याशी येत्या २४ ऑक्टोबर रोजी नेहा लग्नगाठ बांधणार आहे.

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंह याच्याशी येत्या २४ ऑक्टोबर रोजी नेहा लग्नगाठ बांधणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नेहाच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहा आणि रोहन दिल्लीत लग्न करणार असून गुरुवारी नेहाचं संपूर्ण कुटुंब मुंबईहून दिल्लीला रवाना झालं. दिल्लीला पोहोचताच नेहाच्या मेहंदी व हळदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मेहंदी आर्टिस्ट राजू मेहंदीवालाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते नेहावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा : ..म्हणून अर्जुनसोबतचं नातं जगजाहीर करण्याचं ठरवलं- मलायका अरोरा

हळदीच्या कार्यक्रमाचेही काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नेहा व रोहनच्या कुटुंबीयांनी पिवळ्या रंगाचे पोशाख परिधान केले असून सर्वांनी एकत्र मिळून हा फोटो काढला आहे. २० ऑक्टोबर रोजी नेहाचा रोका पार पडला. त्याचा व्हिडीओ नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्येही नेहा व रोहन मिळून भांगडा करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 5:04 pm

Web Title: neha kakkar and rohan preet singhs wedding rituals started mehendi and haldi ceremonies ssv 92
Next Stories
1 सुशांत मृत्यू प्रकरण : बेपत्ता असल्याच्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
2 Power pack energy! सिद्धार्थ जाधवला केदार शिंदेंनी दिल्या खास शुभेच्छा
3 ज्युनिअर एनटीआरवरच्या भूमिकेवरील पडदा दूर; ‘आरआरआर’मध्ये साकारणार ‘ही’ भूमिका
Just Now!
X