बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या इंडियन आयडल या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत आहे. ती इंडियन आयडलच्या सेटवर मजा मस्ती करताना दिसत आहे. नेहाचे सतत सेटवर मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. नुकताच नेहाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी खाताना दिसत आहे.
नेहाचा हा व्हिडीओ तिच्या एका फॅन पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये इंडियन आयडलचे इतर परिक्षक हिमेश रेशमिया पाणीपुरी घेऊन सेटवर येतात. ती पाणीपूरी पाहून नेहाच्या तोंडाला पाणी सुटते. नेहा पाणीपूरी खायला सुरुवात करते. नेहा पाणीपुरी खाते आणि ती लगेच थुंकते.
View this post on Instagram
पाणीपुरी कडू का लागते असे नेहा म्हणते. त्यावर हिमेश मी ती फिटनेसकडे पाहून बनवली आहे असे म्हणतो. त्यानंतर विशाल दादलानी म्हणातात या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये कारल्याचा आणि कडुलिंबाचा ज्यूस आहे. नेहाचे तोंड पाहून विशालला हसू अनावर होते.
नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ जवळपास ९१ हजार लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे.