बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर गाणे चर्चेत आहे. या गाण्याचे नाव ‘सावन में लग गई आग’ असे आहे. हा एक वेडिंग अल्बम आहे.

‘सावन में लग गई आग’ हे गाणे मिका सिंग, पायल देवने कंपोज केले आहे. तर रॅपर बादशाह, नेहा कक्कर आणि मिका सिंगने गायले आहे. तिघांचे हे गाणे प्रदर्शित होताच तुफान व्हायरल झाले आहे. जवळापास १ लाख ४० हजार पेक्षा जास्त लोकांनी ते पाहिले आहे.

या गाण्यातील विक्रांत आणि यामीचा डान्स पाहण्यासारखा आहे. यामीने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती अत्यंत सुंदर अंदाजात दिसत आहे. दरम्यान नेहा, मिका, बादशाह यांचा डान्स देखील चाहत्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.

पाहा फोटो : नेहा कक्करचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहिलात का?

‘गिन्नी वेड्स सनी’ हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोद बच्चन यांनी केली आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने यामी आणि विक्रांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.