24 January 2021

News Flash

नेहा कक्करचा स्टेज परफॉर्मन्स पुन्हा एकदा चर्चेत

या व्हिडीओचे जवळपास 9 लाख व्ह्यूज झाले आहे.

नेहा कक्कर

लाखो तरुणांच्या मनावर आपल्या मधूर आवाजाने जादू करणारी बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्कर ओळखली जाते. नेहाच्या चित्रपटांमधील गाण्यांसोबतच स्टेज परफॉर्मन्स देखील हिट ठरले आहेत. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सध्या नेहा कक्करच्या एका स्टेज परफॉर्मन्सची चर्चा सुरु आहे.

सध्या सोशल मीडियावर थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. अशातच नेहाचा २०१७मधील स्टेजपरफॉर्मन्सचा व्हिडीओ चर्चत आहे. तसेच हा व्हिडीओ आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या व्हिडीओला जवळपास ९ लाख व्ह्यूज आहेत. सध्या जुन्या व्हिडीओंचा ट्रेंड सुरु असल्यामुळे हा व्हिडीओ चर्चेत असल्याचे म्हटले जाते.

नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर बऱ्याच वेळा एकत्र व्हिडीओ शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा ‘ख्याल रख्या कर’ या गाण्यावरचा टिक-टॉक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या बहिण भावाची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करचे ‘भीगी-भीगी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे यूट्यूबर हिट झाले होते. हे गाणे नेहा आणि प्रिंस दूबेने लिहिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 3:53 pm

Web Title: neha kakkar stage performance old video viral on internet avb 95
Next Stories
1 बॉलिवूडमधल्या गटबाजीमुळे माझे १४ चित्रपट रखडले- अध्ययन सुमन
2 पूजा हेगडे आणि प्रभासचा रोमँटिक अंदाज, प्रदर्शित झाला फर्स्ट लूक
3 विकास दुबे एन्काउंटर, पलटलेली गाडी अन् रोहित शेट्टी; जाणून घ्या तिघांमधील कनेक्शन काय?
Just Now!
X