17 January 2021

News Flash

हिमांशूसोबत ब्रेकअपनंतर नेहाची प्रसारमाध्यमांना विनंती

या पोस्टमुळे नेहा पुन्हा चर्चेत आली आहे

नेहा कक्कड

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कड गेल्या काही दिवसापासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. नेहाने प्रियकर हिमांशू कोहलीसोबतच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. या ब्रेकअपनंतर नेहाने अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. नेहाच्या या पोस्टनंतर मीडियामध्ये तिच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. या चर्चा पाहुन नेहाने ट्विटरवर एक पोस्ट करत मीडियाला या चर्चा थांबविण्याची विनंती केली आहे.

नेहाने काही दिवसांपूर्वी इन्स्टावर आणि ट्विटरवर पोस्ट करून हिमांशू आणि तिच्या ब्रेकअपच्या चर्चा थांबविण्याची विनंती केली आहे. ही विनंती करत असताना तिने प्रसारमाध्यमांना ‘डिअर मीडिया’ असं संबोधत या चर्चा थांबवा असं म्हटलं आहे. त्यासोबतच जर चर्चा करायची असेल तर सकारात्मकरित्या करा, कारण आमचा ब्रेकअप परस्पर सामंजस्यातून झाला आहे, असंही तिने सांगितलं.

‘माझा आणि हिमांशूचा ब्रेकअप झाला हे कदाचित विधिलिखित असेल. देवाच्या मनात नसेल त्यामुळेच आम्ही विभक्त झालो. मात्र आमच्या नात्यातील हा दूरावा कोणत्याही गैरसमजातून किंवा वादविवादातून झाला नाहीये. ब्रेकअप करण्याचा निर्णय आमच्या दोघांचा होता. यात कोणाचीही चूक नाही. त्यामुळे प्लीज कोणत्याही अफवा किंवा गैरसमज निर्माण होतील अशा चर्चा पसरवू नका’, अशी विनंती नेहाने केली आहे.

दरम्यान, ब्रेकअप झाल्यानंतर नेहाने स्वत: याविषयीची माहिती सोशल मीडियावर दिली होती. ‘हिमांशूसोबत असलेलं माझं नातं आता जूनं झालं आहे. तो माझा भूतकाळ होता. भूतकाळ म्हणण्यापेक्षा तो माझा वाईट काळ होता. ज्या काळात मी माझ्या घरातल्यांना, मित्र-मैत्रिणींना वेळ देऊ शकत नव्हते’, असं नेहाने म्हटलं होतं. त्यानंतर नेहाने अचानकपणे  मिडीयाला उद्देशून  केलेल्या या नव्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 12:17 pm

Web Title: neha kakkar tweets message media confirming
Next Stories
1 संगीताच्या दुनियेतला बादशहा चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण
2 खलनायकीचा प्राण
3 ठरलं तर ‘बागी ३’मध्ये हिच अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
Just Now!
X