News Flash

‘या पुढे कोणताही रिअॅलिटी शो करणार नाही’, नेहाचा मोठा खुलासा

जाणून घ्या कारण..

नेहा कक्कर हे नाव साऱ्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. नेहा आता इंडियन आयडल या रिअॅलिटी शोच्या परिक्षकाची जबाबदारी पार पाडतं आहे. लवकरच याचा होळी स्पेशल भाग दाखवला जाणार आहे. त्या आधी त्याचा एक प्रोमो दाखवण्यात आला. त्या प्रोमोमध्ये नेहाने एक मोठे घोषणा केली आहे. नेहा या पुढे कोणत्याही रिअॅलिटी शोची परिक्षक होणार नाही असं ती म्हणाली आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून सगळ्यांना धक्का बसला आहे. तर सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

इंडियन आयडल १२ च्या शनिवार व रविवार होळीचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. नेहा कक्कर ही ‘नयना’, ‘प्यार दो प्यार लो’ आणि ‘बद्री की दुल्हनिया’ या गाण्यांवर स्पर्धक निहाल आणि पवनदीप यांच्यासोबत गाणं गातांना दिसते. तिच्या आवाजाने सगळे मंत्रमुग्ध होतात आणि तिला दाद देतात. हे पाहून नेहा भावूक होते. हा शो तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. “इंडियन आयडल माझ्या हृदयाच्या जवळ आणि खूप खास आहे. या शोने मला खूप काही दिलं आहे. म्हणून हा शो सोडून मी दुसरा कोणताही शो करणार नाही. या शोच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन कष्ट करून हा शो सुरू केला आहे. त्यांच्या या कष्टामुळे आज हा शो कलाविश्वातील इतिहासातील एक खास शो आहे.” असे नेहा म्हणते.

नेहा इंडियन आयडलच्या २ ऱ्या पर्वाची स्पर्धेत होती. तर इंडियन आयडलच्या १० पर्वात नेहा परिक्षक झाली. तेव्हा पासून आता १२ व्या पर्वापर्यंत नेहा ही परिक्षक आहे. यापूर्वी नेहा २०१७मध्ये सा रे गा मा पा लिटिलचॅम्पची परिक्षक होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 5:41 pm

Web Title: neha kakkar won t do other reality shows apart from indian idol here s why dcp 98
Next Stories
1 5 स्टार हॉटेलमधून पंकज त्रिपाठीने मनोज वाजपेयीची चोरली चप्पल अन्…
2 सुशांतच्या फोटवर RIP लिहण्याची हिंमत झाली नाही; अंकिताने केला खुलासा
3 गंगुबाई काठियावाडी वादांच्या भोवऱ्यात, आलिया आणि संजय लीला भन्साळीला न्यायालयाने बजावले समन्स
Just Now!
X