News Flash

व्यक्तिरेखेची गरज म्हणून मी ‘ती’ दृश्ये दिली – नेहा महाजन

बीभत्स दृश्ये मंजूर नाही म्हणून मी कितीतरी पटकथा नाकारते.

व्यक्तिरेखेची गरज म्हणून मी ‘ती’ दृश्ये दिली – नेहा महाजन

छायम पोसिया वीडू या तमीळ चित्रपटासाठी दिलेली नग्न दृश्ये किंवा धाडसी दृश्ये ही त्या चित्रपटात मी साकारलेल्या व्यक्तिरेखेची गरज असून, त्यात काहीही बीभत्स नाही असे नेहा महाजन हिने या दृश्यांमागची आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. संतोष व सतीश बाबूसेन या बंधूनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे इंग्रजीत ‘द पेंन्ट हाऊस’ असे नाव आहे. या चित्रपटातील नेहा महाजन हिने दिलेली काही दृश्ये सोशल साईट्सवर व्हायरल झाली असून, त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत खुद्द नेहाशीच संवाद साधला असता तिने सांगितले की, एक ६५ वर्षांचा पुरूष आपल्या मागील आयुष्यात डोकावताना त्याला आपल्यातील तरूण वयातील स्त्री प्रतिमेची जाणिव होते. तेव्हा अशा दृश्याची गरज होती. दिग्दर्शकाने मला हे सर्व समजावून सांगितले. यावर मी माझ्या आई-बाबांशी सविस्तर चर्चा केली व त्यानंतरची मी ही दृश्ये दिली आहेत. ती कोठेही ओंगळवाणी किंवा अश्लील वाटणार नाहीत, याची मी पूर्ण काळजीही घेतली आहे. पण कसलाही सारासार विचार न करताच काहीही मत व्यक्त होणे अजिबात योग्य नाही. किंबहुना बीभत्स दृश्ये मंजूर नाही म्हणून मी कितीतरी पटकथा नाकारते. काही चांगले करण्यावर माझा विश्वास आहे असेही नेहा म्हणाली. या दृश्यावरून चुकीच्या दिशेने चर्चा होऊ नये, अशी अपेक्षा नेहाने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 1:05 am

Web Title: neha mahajan nude scene
Next Stories
1 पुरुष व्यक्तिरेखांच्या शिवराळ भाषेला सेन्सॉर कात्री लावत नाही – स्वस्तिका मुखर्जी
2 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सलमान आणि अनुष्का!
3 माझ्यासाठी ‘लीड रोल’ महत्त्वाचा नाही- नवाजुद्दीन सिद्दीकी
Just Now!
X