01 December 2020

News Flash

निर्मात्यांसोबत भांडण झाल्याने जुन्या अजंली भाभीने सोडली मालिका?

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेत गेली १२ वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली असल्याचे समोर आले. पण नेहाने मालिका का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला होता. एका मुलाखतीमध्ये नेहाने मालिका सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच नेहाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मालिका का सोडली हे सांगितले आहे. नेहाचे मालिकेचे निर्माते असदी मोदी यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी ते ‘तुला मालिका करायची असेल तर कर नाहीतर सोडून दे’ असे म्हणाले असल्याचे नेहाने सांगितले.

यापूर्वीही नेहाने तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता असे म्हटले जात होते. या चर्चांवर उत्तर देत नेहा म्हणाली, ‘या सगळ्या अफवा होत्या. मी आधी ही मालिका सोडण्याचा विचार केला नव्हता आणि मालिकेच्या निर्मात्यांसोबत माझे चांगले नाते आहे. तुम्हाला इंडस्ट्रीचा नियम माहिती आहे काम करायचे असेल तर करा नाही तर सोडून द्या.’

‘मी असिद मोदी यांचा सम्मान करते. मी त्यांना म्हणाले आपण सर्व गोष्टींवर बोलायला हवे. पण त्यावेळी तुम्हाला कोणी असे म्हणत असेल की, तुम्हाला तुमचा इगो सांभाळायला हवा. तुम्हाला मालिका सोडून जायचे असेल तर जाऊ शकता. आमच्याकडे या भूमिकेसाठी दुसरी कोणती तरी अभिनेत्री आहे. ती मालिकेच्या भूमिकेसाठी कमी मानधन घेणार आहे. हे कोणासोबतही घडू शकते. त्यामुळे मी आता या गोष्टीचा फार विचार केला नाही’ असे नेहाने पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 6:15 pm

Web Title: neha mehta on quieting tarak mehta ka oolta chashma show avb 95
Next Stories
1 ‘अग्गंबाई सासूबाई’ : निवेदिता सराफ यांना करोना झाल्याने मालिकेत केला ‘हा’ बदल
2 ‘केबीसी’मध्ये बिग बींनी पहिल्याच स्पर्धकाला विचारला सुशांतविषयी ‘हा’ प्रश्न
3 “त्या वेळी रामदास आठवले कुठे होते?”; ‘तो’ फोटो पाहून स्वरा भास्कर संतापली
Just Now!
X