28 January 2020

News Flash

नील नितीन मुकेशने साकारलेल्या ‘या’ भूमिकेमुळे वडिलांनी धरला होता ६ महिने अबोला

या भूमिकेसाठी नीलला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं

नील नितीन मुकेश

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नील नितिन मुकेश याचा आज वाढदिवस. बी टाऊनचा हॅण्डसम हंक म्हणून लोकप्रिय असलेला हा अभिनेता उत्तम अभिनय कौशल्य असतानाही फार कमी चित्रपटांमध्ये झळकल्याचं पाहायला मिळतं. नील जितक्या ताकदीने एखाद्या नायकाची भूमिका साकरतो. तितकीच खलनायकाची भूमिकाही उत्तमरित्या पेलतो. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारणारा नील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर छाप पाडताना दिसतो. परंतु ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याचे वडील नाराज झाले होते. इतकंच नाही तर त्यांनी चक्क सहा महिने अबोला धरला होता.

नीलने २००७ साली ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.  परंतु यात त्याने खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे त्याचे वडील नाराज झाले होते.

बॉलिवूड पदार्पण करत असताना पहिल्याच चित्रपटात त्याने निगेटीव्ह भूमिका साकाल्यामुळे त्याच्या वडिलांचा हिरमोड झाला होता. परिणामी, त्यांनी चक्क सहा महिने नीलसोबत अबोला धरला होता.

वाचा : Video : जबराट! डान्स बघून येईल मायकल जॅक्सनची आठवण; बिग बी, हृतिकही झाले फिदा

दरम्यान, या चित्रपटासाठी नीलला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटानंतर त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याच्या वाट्याला अनेक वेळा सह कलाकाराचीच भूमिका आली.

First Published on January 15, 2020 9:02 am

Web Title: neil nitin mukesh happy birthday negative role the father was not talking ssj 93
Next Stories
1 नेत्रहीन डॉ. दिव्यांनी गायलं ‘डोळ्यांमदी तुझा चांदवा’
2 Video: सुपरवुमन उर्वशी रौतेला! उचललं १०० किलो वजन
3 दीपिकाच्या JNU भेटीवर अखेर मेघना गुलजारने सोडलं मौन
Just Now!
X