बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर सोडले होते. त्यानंतर तिने निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांना मेसेज केला होता. आता त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलण झालं हे समोर आले. ते पाहून नेटकऱ्यांनी महेश भट्ट यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

काय होते मेसेज?

रियाने घर सोडल्यानंतर लगेचच महेश भट्ट यांना मेसेज करुन म्हटलं होतं की, “जड अंतकरणाने आणि सुटकेचा निश्वास टाकत आयेशा पुढची वाटचाल करत आहे”. आयेशा हे रियाचं ‘जलेबी’ चित्रपटातील पात्राचं नाव आहे. महेश भट्ट या चित्रपटाचे निर्माता होते.

“आपला शेवटचा फोन मला जाग देणारा होता. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. तेव्हाही आणि आत्ताही” असे पुढे तिने म्हटले. सूत्रांनुसार, महेश भट्ट यांनी रियाच्या मेसेजला उत्तर दिलं होतं की, “मागे वळून पाहू नकोस. जे अशक्य आहे ते शक्य कर. तुझे वडील आता आनंदी असतील”.

रियाने त्यावर “तुम्ही त्यादिवशी फोनवर मला माझ्या वडिलांबद्दल जे सांगितलंत त्यामुळे मला बळ मिळालं. त्यांनी तुमचे आभार मानले आहेत. माझ्यासाठी एक विशेष व्यक्ती राहिल्याबद्दल तुमचे आभार”.

पुढे भट्ट यांनी यावर म्हटलं की, “तू माझ्या मुलीसारखी आहेस. मला आता हलकं वाटतंय”.  यावर रिया म्हणते, “माझ्याकडे शब्द नाहीत”. महेश भट्ट त्यानंतर रियाला असंच खंबीर राहा सांगत आभार मानले होते.