28 November 2020

News Flash

मराठी सिनेसृष्टीची दुबईतून नवी सुरुवात

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या माध्यमातून प्रथमच परदेशात २० ते २३ जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रीमियर सोहळा रंगणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चंदेरी दुनियेचा झगमगाट विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळत असतो. मात्र करोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील या झगमगाटाचा दिमाख काहीसा कमी झाला आहे. मनोरंजनाचा वसा घेत प्रेक्षकांना सातत्याने काही तरी नवं देऊ पाहणाऱ्या कलाकारांनी नाउमेद न होता नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाचा श्रीगणेशा करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या माध्यमातून प्रथमच परदेशात २० ते २३ जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रीमियर सोहळा रंगणार आहे.

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून यात बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये २०२१ मधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही या वेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. उत्तम आशय आणि विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षांची भेट ठरणार आहे.

‘५ जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या या रंजक सोहळ्यात चित्रपटांच्या मेजवानीसह रंजक कार्यक्रमांची रेलचेल प्रेक्षकांसाठी असणार आहे. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या निमित्ताने रंगणारा मनोरंजनाचा हा धमाकेदार सोहळा रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार हे नक्की. मराठीतील प्रसारमाध्यमांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:00 am

Web Title: new beginning of marathi cinema from dubai abn 97
Next Stories
1 कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक, एनसीबीची कारवाई
2 ‘तोरबाज’च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त ‘मसीहा’च्या भूमिकेत
3 …म्हणून ‘राऊडी बेबी’च्या यशानंतर साई पल्लवीचे चाहते झाले नाराज
Just Now!
X