News Flash

दिलजीत दोसांझ आणि परिणिती साकारणार ‘चमेली की शादी’

रोहित जुगराज करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

बॉलीवूडमध्ये सध्या प्रदर्शित होणाऱ्या अर्ध्याहून अधिक चित्रपटांतून ‘ऑनस्क्रिन’ अनेक नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखी एका जोडीची नव्याने भर पडणार असेच दिसते आहे. ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आ…’ या गाण्यातून तिच्या अदांनी रसिकांना घायाळ करणारी परिणिती चोप्रा आणि ‘उडता पंजाब’ मध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणाऱ्या दिलजीत दोसांझ या दोघांनाही एकत्र पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. ‘चमेली की शादी’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये हे दोन कलाकार एकत्रितरित्या काम करताना दिसतील, अशा चर्चेची हवा सध्या बॉलीवूडमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. चित्रपटाच्या रिमेकबाबत अजून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही ‘फॅन्टम’तर्फे या चित्रपटाचे सर्व हक्क घेण्यात आले असून रोहित जुगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळते आहे.
परिणिती चोप्रा सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून, ‘उडता पंजाब’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझलाही त्याचे अभिनय कौशल्य पाहता अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. परिणितीने या आधी ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’, ‘हसी तो फसी’, ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटांतून रसिकांमध्ये आपले स्थान बनवले आहे. तर, ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगळ्या धाटणीचा अभिनय सादर करत ‘देसी मुंडा’ दिलजीतनेही चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. दिलजीतच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणीही चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तेव्हा बॉलीवूडला गवसलेला हा नवीन ‘पंजाबी नायक’ बी टाउनमध्ये स्वत:ची जागा बनवण्यात नक्किच यशस्वी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:37 pm

Web Title: new couple in b town parineeti chopra and diljit dosanjh pair up for chameli ki shaadi remake
Next Stories
1 पुद्दुचेरीत सार्वजनिक सुविधांचा वापर करणाऱ्यांना सरकारने दिली ‘कबाली’ चित्रपटाची तिकिटे
2 अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल
3 टायगर साकारणार ‘मुन्ना मायकल’
Just Now!
X