News Flash

मुलींचं भावनाविश्व उलगडणारा ‘विस्टल ब्लोईंग सूट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट तयार करण्यासाठी लागला ५ वर्षांचा कालावधी

मराठी कलाविश्वात रोज नवनवीन बदल घडताना दिसून येत आहेत. उत्तम कथानक आणि नव्या धाटणीचे चित्रपट सध्याच्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.त्यामुळे आता बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटदेखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवू लागले आहेत. यामध्येच आता पुन्हा एक नव्या विषयावर भाष्य करणारा ‘विस्टल ब्लोईंग सूट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्ञानेश्वर मर्गज दिग्दर्शित या चित्रपटातून एका मुलीच्या विविध भावभावनांच्या आविष्कारांचा एक विस्तीर्ण पट उलगडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन खरा वाटावा यासाठी अनेक रिअॅलिस्टिक लोकेशन्स घेण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास ५ वर्षांचा कालावधी लागला आहे. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे.

दरम्यान, आई श्री भगवतीदेवी प्रोडक्शन निर्मित या चित्रपटात अभिनेत्री विशाखा कशाळकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशाखाने यापूर्वी ‘नोंकझोक’ या हिंदी मालिकेत बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 3:03 pm

Web Title: new marathi movie whistle blowing suit coming soon ssj 93
Next Stories
1 “ज्या हातांनी भरवलं ते हात कापायचे नसतात”; स्वरा भास्करचं कंगनाला प्रत्युत्तर
2 ‘जे पेराल तेच उगवेल’; रियाला अटक होताच शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
3 नव्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाड सज्ज; घेतीये ‘ही’ खास मेहनत
Just Now!
X