छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील सरु आजी सध्या चांगल्याच लोकप्रिय होत असून तरुणाईमध्ये त्यांच्या हटके म्हणींची क्रेझ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सरु आजी रॉकस्टार ठरत आहेत.
काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेतील डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा, डॉक्टर अजितकुमार ही पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये सरु आजीची चर्चा थेट सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा- मंजुळा दाखवणार डॉ. अजितकुमारचं खरं रुप? गावासमोर उघड होणार ‘ही’ गोष्ट
सध्या सोशल मीडियावर या म्हणी प्रचंड व्हायरल होत असून या म्हणींपासून काही मीम्सदेखील तयार करण्यात आल्यांच पाहायला मिळत आहे. सरु आजींची ही भूमिका अभिनेत्री रुक्मिणी सुतार या साकारत असून उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्या प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहेत.