News Flash

देवा आणि मोनिकाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणार का?

या मालिकेत आता एक रोमॅन्टिक ट्विस्ट येणार आहे.

झी युवावरची डॉक्टर डॉन ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. डॅशिंग डॉन आणि डार्लिंग डिन यांची केमिस्ट्रीही रंगू लागलीये. या मालिकेत आता एक रोमॅन्टिक ट्विस्ट येणार आहे.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि, एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने मोनिका, राधा आणि कबीर एका गावात येतात. पण सध्याच्या करोनाग्रस्त वातावरणात गावकरी त्या गावात त्यांना प्रवेश करायलाच मज्जाव करतात आणि त्यांना गावाच्या वेशीबाहेर राहायला सांगतात. यात मदत म्हणून डीन मोनिका देवाला फोन करते. देवा तिचा फोन घेणार का आणि त्यांना या संकटातून बाहेर काढणार का हे मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल.

लॉकडाउनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण अनलॉक प्रक्रिया सुरु होताच सरकारने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली. त्यासाठी काही नियम आखण्यात आले. आता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे ‘झी युवा’वरील ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळत आहे. पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात करोना योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 12:32 pm

Web Title: new romantic twist in dr don serial ssv 92
Next Stories
1 …म्हणून बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ला प्रदीप शर्मांनी बजावली नोटीस
2 कंगनाच्या सुरक्षेसाठी आईने केली पूजा; पाहा व्हिडीओ
3 ‘अभय 2’ मधील ‘त्या’ फोटोप्रकरणी Zee 5 ने मागितली माफी, म्हणाले…
Just Now!
X