08 March 2021

News Flash

‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट

१३ जुलैपासून मालिकेचे नवीन एपिसोड्स पाहायला मिळणार

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरु आहेच पण दीपा आणि दीपाची बहिण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.

दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या, श्वेता आणि राधाई यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दीपाऐवजी श्वेताचं लग्न कार्तिकशी व्हावं म्हणून सौंदर्याने प्लॅनही आखलाय. यासाठी दीपा आणि श्वेताचा लग्नातला ड्रेस अगदी सारखा ठरवण्यात आलाय. आता ऐन मुहूर्तावेळी दीपाऐवजी श्वेता लग्नासाठी उभी राहणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. त्यामुळे कार्तिकचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची उत्सुकता आहे.

‘रंग माझा वेगळा’चे पुढील भाग अत्यंत उत्सुकता वाढवणारे असतील. जवळपास तीन महिन्यांनंतर मालिकेच्या शूटिंगच्या सुरुवात झाली आहे. त्यामुळे कथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अटीशर्तींचे पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे. अनेक मराठी मालिकांनी पुन्हा कामाला सुरुवात केली असून आता प्रेक्षकांना लवकरच नवीन एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 11:40 am

Web Title: new twist in marathi serial rang majha vegla on star pravah ssv 92
Next Stories
1 “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते”; जगदीप यांचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…
2 लोकांच्या नकळत अक्षय कुमार चोरतो त्यांचे घड्याळ; माधुरी दीक्षितने केला खुलासा
3 सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने ट्रोलिंगला कंटाळून घेतला ‘हा’ निर्णय
Just Now!
X