News Flash

‘सरस्वती’ मालिकेमध्ये दुर्गाच करणार सरस्वतीचा घात!

सरस्वती कसा मार्ग काढेल या संकंटातून?

saraswati serial
'सरस्वती' मालिकेमध्ये दुर्गाच करणार सरस्वतीचा घात!

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सरस्वतीच्या मृत्यूनंतर वाड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या ज्याला प्रेक्षकदेखील साक्षीदार आहेत. त्यानंतर सरस्वतीसारख्या दिसणाऱ्या मुलीला म्हणजेच दुर्गाला विद्युल आणि भुजंगने वाड्यामध्ये आणणे, सरस्वतीचे मालिकेमध्ये परतणे, राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे, हे सगळे घडत असतानाच सरस्वतीला असणारा आजार राघवला कळणे या सगळ्याच गोष्टी खूप आश्चर्यजनक होत्या. पण आता मालिकेमध्ये अजून एक रंजक वळण येणार आहे, ज्यामध्ये दुर्गा नकारात्मक होणार असून, राघव आपले प्रेम आहे याची कल्पना आल्याने ती सरस्वतीचा काटा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे हिला अजून एका नव्या अंदाजात बघणे प्रेक्षकांसाठी सरप्राइजच असणार आहे. तेव्हा आता मालिकेमध्ये दुर्गा सरस्वतीचा काटा कसा काढेल ? राघवला दुर्गाच्या मनामध्ये काय आहे हे कळेल का ? सरस्वतीला हे कळल्यावर ती कशी या संकंटाला सामोरी जाईल हे बघणे रंजक असणार आहे.

या नव्या आव्हानाबद्दल बोलताना तितिक्षा म्हणाली, ‘एक कलाकार म्हणून माझी वेगवेगळी रूपं, भूमिकेमधील शेड्स दाखविण्याची उत्तम संधी मला सरस्वती या मालिकेने अनेकदा दिल्या आहेत. आणि मी खूप भाग्यवान आहे कि, हीच मालिका करताना आता मला नकारात्मक भूमिका करण्याची संधी देखील मिळत आहे, डबल रोल आणि आता ही संधी नक्कीच आव्हानात्मक आहे पण मी नक्कीच ही जबाबदारी पूर्णपणे निभावण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्यावर राहू दे’.

सरस्वती मालिकेमध्ये दुर्गाची एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून दुर्गाची भाषा, तिची बोलण्याची स्टाईल, सगळचं प्रेक्षकांना आवडत आहे. दुर्गाचं उदे ग अंबे उदे बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दुर्गाचा बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडतं आहे. तिच्या प्रत्येक कारस्थानांना, चालींना दुर्गा उलटून लावत आहे. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना अजून एक सरप्राइज मिळाले ते म्हणजे त्यांची लाडकी सरस्वती, मोठ्या मालकांची सरू मालिकेमध्ये नुकतीच परतली. एकीकडे दुर्गा हि अत्यंत बिनधास्त आणि सरस्वती थोडी जपून वागणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी अशी आहे. दुर्गाचा वाड्यातील वावर खूपच बिनधास्त आहे, त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण तयार झाले होते पण आता दुर्गाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 1:21 am

Web Title: new twist in saraswati marathi serial
Next Stories
1 BLOG : या अभिनेत्रींचं धक्कादायक जाणे…
2 श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास उशीर होण्याची शक्यता
3 श्रीदेवीच्या निधनाने कलाविश्वात शोककळा; होळी सेलिब्रेशन केले रद्द
Just Now!
X