News Flash

‘साथ दे तू मला’ मालिकेत नवा ट्विस्ट

लग्न की नोकरी? काय असेल प्राजक्ताचा निर्णय?

‘साथ दे तू मला’

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे. प्राजक्ताने लग्नानंतर नोकरी करु नये अशी समीरच्या आईची इच्छा आहे. आयुष्यभर संसारासाठी खस्ता खाल्लेल्या आईची इच्छा मोडणार कशी? यासोबतच प्राजक्ताच्या स्वप्नांचं काय? अश्या द्विधा मनस्थितीत अडकलेला समीर अखेर प्राजक्ताला लग्नानंतर नोकरी न करण्याचा सल्ला देतो.

समीरच्या या निर्णयाने प्राजक्ताला धक्का बसतो. लग्नानंतरही तिला घर सांभाळून आपलं करिअर करायचं आहे. मात्र नोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झालीय. या निर्णायक प्रसंगी प्राजक्ता करिअरला प्राधान्य देणार की लग्नाचा प्रस्ताव नाकारणार याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचं आहे. करिअरसाठी सबकुछ कुर्बान असं मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. तेव्हा आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:25 pm

Web Title: new twist in sath de tu mala marathi serial on star pravah
Next Stories
1 डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
2 …म्हणून प्रभास झाला भावूक
3 Photo : उधम सिंग यांच्या भूमिकेतील विकी कौशल
Just Now!
X