News Flash

कुत्र्याच्या हल्ल्यात अभिनेत्री निया शर्मा जखमी

'इश्क में मरजावां'मधील एक भाग निया आणि अलीशा पन्वर यांच्यावर चित्रीत करण्यात येत होता.

कुत्र्याच्या हल्ल्यात अभिनेत्री निया शर्मा जखमी
निया शर्मा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा ‘इश्क में मरजावां’च्या सेटवर जखमी झाली आहे. मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना सेटवर एका कुत्र्याने नियावर हल्ला केल्यामुळे ती जखमी झाली आहे. यात नियाला किरकोळ दुखापत झाली असून सध्या तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

‘इश्क में मरजावां’मधील एक भाग निया आणि अलीशा पन्वर यांच्यावर चित्रीत करण्यात येत होता. चार रानटी कुत्र्यापासून या दोघी स्वत:चा बचाव करत असल्याचं यात दाखविण्यात येणार होतं. मात्र अचानकपणे या चार कुत्र्यांपैकी एकाने नियावर हल्ला केला. या हल्ल्यात नियाच्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे.

 

View this post on Instagram

 

No but he’s cute n all..

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

कुत्र्याने नियावर हल्ला केल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी नियाला डॉक्टरांनी इंजक्शन दिलं असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ‘एक हजारो में मेरी बहेना है’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निया शर्मा अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. ‘एक हजारो में मेरी बहेना है’ या मालिकेव्यतिरिक्त ती ‘जमाई राजा’ या मालिकेमध्येही झळकली आहे. आपल्या अभिनयापेक्षा निया तिच्या सोशल मिडीयावरील वावरामुळे जास्त चर्चेत असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 5:52 pm

Web Title: nia sharma attacked by dogs on ishq mein marjawan shoot
Next Stories
1 Rajinikanth’s 2.0 mania : 2.0 पाहण्यासाठी ऑफिसला सुट्टी
2 Photo : सोनाक्षीच्या आयुष्यात कोण आलंय ठाऊक आहे?
3 Video : ‘रजनी’प्रेमात चाहते सैराट; एण्ट्रीवर नाचण्यासाठी चित्रपट ३ मिनिटं केला ‘पॉझ’
Just Now!
X