News Flash

निक जोनासनं दिला साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा

प्रियांकासोबत त्यानं साखरपुडा केला हे वुत्त ऐकून आनंद झालेल्या चाहत्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

निक जोनास- प्रियांका चोप्रा

अमेरिकन सिंगर निक जोनासनं देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत साखरपुडा केला अशा चर्चा होत्या. प्रियांकानं या चर्चांवर उत्तर देण्यास साफ नकार दिला. मात्र निकनं अनावधानानं आपल्या कृतीतून प्रियांकासोबत साखरपुडा केल्याच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान निकच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षांव केला. प्रियांकासोबत त्यानं साखरपुडा केला हे वुत्त ऐकून आनंद झालेल्या चाहत्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे काहीही न बोलता त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार करत चाहत्यांचे आभार मानले. निकनं आपल्या कृतीतून साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा दिला आहे असं मानलं जात आहे.  स्वत:चा संसार थाटावा हेच माझं स्वप्न आहे असंही निक म्हणाला.

साखरपुड्याबद्दल प्रियांकालाही नुकतेच काही प्रश्न विचारण्यात आले मात्र याविषयी उत्तर देण्यास मी बांधील नाही असं सडेतोड उत्तर तिनं दिलं. माझं खासगी आयुष्य आहे आणि ते मला सार्वजनिक करायचं नाही. माझ्या आयुष्यातील ९०% गोष्टी या सार्वजनिक आहेत पण १० % गोष्टी माझ्या स्वत:च्या आहेत. माझी मैत्री, कुटुंब, माझी नाती इतरांसमोर उघड करावीशी मला वाटत नाहीत. मी कार्यालय चालवत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण किंवा उत्तर देण्यास मी बांधील नाही’ असं म्हणत तिनं उत्तर देणं टाळलं होतं.

प्रियांका आणि निकनं जुलै महिन्यात साखरपुडा केला. तर सप्टेंबरमध्ये हे जोडपं विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा आहेत मात्र अद्यापही दोघंही या वृत्तावर मौन बाळगून आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 11:53 am

Web Title: nick jonas confirms engagement with priyanka chopra
Next Stories
1 कारगीलमधल्या ‘त्या’ शूरवीराची व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक
2 VIRAL: ‘तख्त’च्या स्टारकास्टमध्ये तैमूर कुठंय, नेटकऱ्यांचा करणला खोचक सवाल
3 अशी आहे मनिषाच्या ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरी’ची पहिली झलक
Just Now!
X