News Flash

वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न

३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंडशी केले लग्न

हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे निकोलस. ‘घोस्ट रायडर’ या चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणाऱ्या निकोलसचे जगभरात चाहते आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. आता निकोलसने वयाच्या ५७व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे.

नुकताच निकोलसने पीपल मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर त्याच्या लग्नाविषयी सुरु असलेल्या चर्चांवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘हो हे खरे आहे. मी लग्न केले आहे. आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असून खूप आनंदी आहोत’ असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nicolas Cage (@nicolascagefans)

निकोलसने पाचव्यांदा लग्न केले आहे. ते ही त्याच्या पेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत. रीको ही २६ वर्षांची आहे. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा लॉस वेगसमधील एका हॉटेलमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पण निकोलसने त्याच्या लग्नाबाबतची माहिती मीडियाला दिली नव्हती. निकोलसच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. म्हणून त्याने याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

निकोलसने लग्नानंतर एक पार्टी आयोजीत केली होती. या पार्टीला त्याच्या एक्स पत्नी Alice Kimने हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा १५ वर्षांचा मुलगा Kal-El देखील हजर असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 6:48 pm

Web Title: nicolas cage 5th marriage riko shibata avb 95
Next Stories
1 मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले? जय आणि माही विजवर नेटकऱ्यांनी केले आरोप
2 नवरीवानी नटली आलिया तर रणबीर झाला म्हातारा, पण कशासाठी?
3 ‘स्वत:ला आरशात बघितल्या नंतर मला तिरस्कार वाटायचा’, इलियाना डिक्रुझने केला खूलासा
Just Now!
X