करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

निखिल गेल्या काही दिवसांत सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्रस्त होता. दरम्यान त्याने एकदा करोना टेस्ट दिली. त्याची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने पुन्हा एकदा टेस्ट करुन पाहिली. यावेळी मात्र त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. निखिल सोबतच त्याच्या कुटुंबीयांची देखील टेस्ट घेण्यात आली होती मात्र घरातील सर्व मंडळी निगेटिव्ह आहेत. सध्या अभिनेत्यावर त्याच्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु आहेत.

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

२४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ५३५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. ज्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आज घडीला ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर महाराष्ट्रात आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.