News Flash

Big Boss 14: निक्कीने धुतली अभिनेत्याची अंतर्वस्त्रं; माजी स्पर्धक संतापले

'बिग बॉस'मध्ये टिकून राहण्यासाठी काहीही; निक्कीने धुतली अभिनेत्याची अंतर्वस्त्रं

‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता चार आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी प्रत्येक स्पर्धक शोमध्ये टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान अभिनेत्री निक्की तांबोळी हिने एलिमिनेशनपासून वाचण्यासाठी चक्क अभिनेता एजाज खानची अंतर्वस्त्रं देखील धुण्यास होकार दिला. तिच्या या निर्णयावर अभिनेत्री काम्या पंजाबी हिने संताप व्यक्त केला आहे. एजाजचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

अवश्य पाहा – ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल

प्रकरणर काय आहे?

अभिनेता एजाज खान सध्या बिग बॉसच्या घरात कर्णधाराची भूमिका साकारत आहे. नियमाप्रमाणे घरातील स्पर्धकांना कर्णधाराच्या आदेशांचं पालन करण बंधनकारक आहे. मात्र एजाज आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याची तक्रार घरातील इतर स्पर्धक करत आहेत. नुकतेच एजाजने निक्कीकडून आपली अंतर्वस्त्रं धुवून घेतली. तिने देखील एलिमिनेशनपासून वाचण्यासाठी एजाजला नकार दिला नाही. दरम्यान या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून बिग बॉसचे माजी स्पर्धकही संतापले आहेत.

“हे काय चाललं आहे बिग बॉसच्या घरात. एजाज कॅप्टन असल्याचा गैरफायदा घेतोय. एका मुलीला तो आपली अंतर्वस्त्रं धुण्यास सांगतोय. त्याचं डोकं ठिकाणावर आहे का?” अशा आशयाचं ट्विट करत काम्या पंजाबी हिने आपला संताप व्यक्त केला. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 2:25 pm

Web Title: nikki tamboli eijaz khan big boss 14 mppg 94
Next Stories
1 …म्हणून आदित्यने घेतला सोशल मीडियापासून ब्रेक
2 ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, स्पर्धकाला हरताना पाहून अमिताभ बच्चन देखील झाले दु:खी
3 कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? शाहरुखच्या प्रश्नावर ऐश्वर्याची गुगली
Just Now!
X