‘बिग बॉस 14’ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. टास्क खेळण्याची पद्धत आणि घरातल्यांसोबत झालेली भांडणं यामुळे निक्की कायम चर्चेत राहिले. विशेष म्हणजे तिच्या याच बिनधास्त अंदाजामुळे तिने अनेकांची मनं जिंकून घेतली. निक्कीची वाढत असलेली लोकप्रियता पाहता आता तिला बॉलिवूडमधून चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

निक्की तांबोळी हे दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. ‘कंचना 3’या चित्रपटात झळकलेली निक्की आता बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. खुद्द निक्कीनेच याविषयी खुलासा केला आहे. ‘बिग बॉस 14’ चं पर्व संपल्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, निक्कीने बिग बॉसपूर्वी दाक्षिणात्य कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘कंचना 3’, ‘चिकती गदिलो चितकोतुडु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ अशा चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.