News Flash

खऱ्या आयुष्यातदेखील हत्तीसारखं खाता का?; ‘तारक मेहता’मधील ‘डॉ. हाथी’ म्हणाले…

खऱ्या आयुष्यात डॉ. हाथीसारखंच खाता का?; अभिनेता म्हणाले...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं आपल्या अनोख्या अंदाजामुळे एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परिणामी खऱ्या आयुष्यातील देखील हे कलाकार असेच वागतात की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. अगदी डॉ. हाथी या व्यक्तिरेखेचंच घ्याना…. तारक मेहतामध्ये अभिनेता निर्मल सोनी डॉ. हाथी ही व्यक्तिरेखा साकारतात. या मालिकेत ते आपल्या नावाप्रमाणेच भरपूर अन्न ग्रहण करताना दिसतात. परंतु खऱ्या आयुष्यात देखील ते तसेच आहेत का?

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

निर्मल सोनी यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गुपीतं उघड केली. ते म्हणाले, “माझ्या रिल आणि रिअल लाईफमध्ये फारसा फरक नाही. मी डॉ. हाथीप्रमाणेच खुशालचेंडू आयुष्य जगतो. सतत आनंदी राहतो अन् इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण खाण्याच्या बाबतीत मात्र मी डॉ. हाथीपेक्षा वेगळा आहे. मला विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. परंतु मी खूप नियंत्रणात खातो. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणेच सकस आहार घेतो. माझं शरीर तुम्हाला अवाढव्य वाटत असलं तरी देखील अगदी मोजून मापून मी खाणं पसंत करतो. मालिकेत जी तुम्हाला खाण्याची दृष्य दिसतात त्यामध्ये मी केवळ अभिनय करत असतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 1:33 pm

Web Title: nirmal soni taarak mehta ka ooltah chashmah mppg 94
Next Stories
1 २०२० या वर्षात सकारात्मक राहण्यासाठी काय केलं?, दिलजीतने सांगितला त्याचा ‘हॅपिनेस फंडा’
2 ‘अंदाज अपना अपना’चे सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिदरी काळाच्या पडद्याआड
3 “ताई तुला वेड लागलं आहे का?”; वाईनसोबत बिस्किट खाणारी स्वरा होतेय ट्रोल
Just Now!
X