बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे विकी कौशल. ‘उरी’ आणि ‘राजी’ या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय करुन विकीने प्रेक्षकांची मन जिंकली. तेव्हापासून विकी चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहेत. काही दिवसांपासून त्याची आणि अभिनेत्री कतरिना कैफची चर्चा रंगत आहेत. त्यांच्या या चर्चा थांबत नाही तोच आता विकीबद्दल एका नव्या चर्चेला उधाण आल आहे. कंडोमवर आधारित एका चित्रपटामध्ये काम करण्यास विकीने नकार दिल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.

‘स्पॉट बॉय’नुसार, विकीच्या लोकप्रियतेमुळे त्याला नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. यामध्ये त्याला कंडोमवर आधारित एका चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र विकीने ‘नो कंडोम प्लीज’ असं म्हणत चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

View this post on Instagram

 

Ik vaari hor! . . . @khamkhaphotoartist x @amandeepkaur87

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on


दरम्यान,कधीही स्पष्टपणे व्यक्त होता न येणाऱ्या चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये आयव्हीएफ पद्धतीने बाळाला जन्म देणं. कंडोम, मासिक पाळी या सारखे विषयीदेखील हाताळले गेले आहेत. अशा चित्रपटांमध्ये अक्षयकुमार सारख्या बॉलिवूड कलाकारांनी कामदेखील केलं आहे. मात्र विकीने या धाटणीच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. विकी बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार असून त्याचे ‘राजी’, ‘संजू’, ‘मनमर्जियां’ आणि ‘उरी’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.