02 December 2020

News Flash

विराटला अनुष्का नाही तर ही अभिनेत्री वाटते ‘क्यूट’

'ब्लाइंड डेट'लाही विराट गेल्याचं मान्य करतो

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं प्रेम हे कोणापासूनही लपलेलं नाही. दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र पाहण्यात आलंय. आता आयपीएलचे सामनेही सुरू झाले आणि ‘विरूष्का’ पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये आले. या दोघांनाही काही महिन्यांपूर्वी युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नात एकत्र पाहिले होते. या दोघांचा एकत्र असा कोणताही फोटो इंटरनेटवर काही क्षणात व्हायरल होतो आणि मग चर्चा रंगू लागतात त्या विरूष्काच्या प्रेमाच्या..

नुकताच विराटने त्याच्या इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर अनुष्कासोबतचा डीपी ठेवला आणि आपल्या प्रेमाची कबूली दिली. पण एक वेळ अशीही होती की, त्याला अनुष्कापेक्षा इतर बॉलिवूड अभिनेत्री जास्त आवडायच्या. विराटला अनुष्का नाही तर जेनेलिया डिसुझा आवडायची.

आता तुम्हाला वाटेल की, असं कसं होऊ शकतं. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही पटले की, विराटची आवडती अभिनेत्री जेनेलिया होती. या व्हिडिओमध्ये विराट, अनुषा दांडेकरसोबत गप्पा मारताना दिसतो. हा व्हिडिओ सामन्यानंतरच्या पार्टीदरम्यानचा असावा. अनुषा जेव्हा विराटला, कोणत्या अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना बघायला आवडेल? असा प्रश्न विचारते तेव्हा विराट जेनेलियाचं नाव घेताना दिसतो. यावर जेनेलियाचं का? इतर कोणत्या अभिनेत्री का नाही? असा प्रश्न दांडेकरने विचारल्यावर, ती फार क्टूट आहे असं उत्तर विराट देतो. यानंतर ‘ब्लाइंड डेट’लाही विराट गेल्याचं मान्य करत, मुलगी दिसायला चांगली नव्हती म्हणून अवघ्या ५ मिनिटांत तिथून पळून आल्याचा किस्साही त्याने यावेळी सांगितला.

दरम्यान, नुकताच अनुष्काने तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती दुखापतग्रस्त विराटला भेटायला गेली होती. विराट- अनुष्काचे हे फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:44 pm

Web Title: not anushka sharma but virat kohli found genelia dsouza cute in this throwback video
Next Stories
1 कटप्पामुळे या राज्यात ‘बाहुबली २’ ला तीव्र विरोध, सिनेमा प्रदर्शित न करु देण्याची धमकी
2 अक्षयच्या ‘पॅडमॅन’मध्ये आता ‘शहेनशहा’ही
3 ‘भूमिकेसाठी पूर्वतयारी करणे वगैरे मला जमत नाही’
Just Now!
X