07 March 2021

News Flash

पैसा महत्त्वाचा नाही, नुसरत भरूचानं नाकारली १ कोटींची ऑफर

माझ्या मते पैसा महत्त्वाचा नसतो, तुम्ही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असलं पाहिजे, असं मत नुसरतनं व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटानं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली.

‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुच हिनं १ कोटींची ऑफर नाकारली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकानं तिला १ कोटींची ऑफर दिली होती मात्र तिनं ती नाकारली आहे.

नुसरतच्या वाट्याला सध्या बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट नाही. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ चित्रपटानं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली. या कमी बजेट असणाऱ्या चित्रपटानं १०० कोटींचा गल्ला पार केला होता. यात नुसरतच्या कामाचं खूपच कौतुक झालं. तिचं काम पाहून तिला एका दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी १ कोटींची ऑफर देऊ केली होती. मात्र तिनं ही ऑफर नाकारली आहे. माझ्या मते पैसा महत्त्वाचा नसतो, तुम्ही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असलं पाहिजे. गुणवत्तेवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे असं नुसरतचं मत आहे म्हणूनच तिनं ही ऑफर नाकारली आहे.

जर कथा चांगली असेल तर आपण नक्कीच प्रादेशिक चित्रपटात काम करू, अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका मला भावली पाहिजे ती भूमिका आव्हानात्मक असली पाहिजे, माझ्यासाठी काम करताना पैशांपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत असं नुसरतनं स्पष्ट केलं आणि याच कारणामुळे तिनं ही ऑफर नाकारल्याचं समजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 3:23 pm

Web Title: nushrat bharucha rejected rs 1 crore offer here why
Next Stories
1 वर्षांतून २१ दिवस अभिनय आणि क्रिकेटपासून विरुष्का राहणार लांब
2 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत आर्वी आणि लक्ष्मीची जमणार गट्टी
3 Video : ..अन् चालता चालता काजोल पडली
Just Now!
X