नुकताच अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटातील ‘ओ साकी साकी’ या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही बेली डान्स करताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. परंतु ‘ओ साकी साकी’ या मूळ गाण्यातील अभिनेत्री कोयना मित्राने गाण्याचे रिक्रिएट व्हर्जनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘ओ साकी साकी’ हे गाणे ‘मुसाफिर’ या चित्रपटीत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कोयना मित्रा आणि अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. आता या नव्या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमुळे कोयना मित्राने नाराजी व्यक्त केली आहे. हे नवे गाणे ‘मेस’ असून जुन्या गाण्याची वाट लावण्यात आल्याचे कोयना म्हणाली आहे. कोयनाने ‘ओ साकी साकी’चे रिक्रिएट व्हर्जन प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर नाजारी व्यक्त केली होती.

कोयनाने तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुसाफिर चित्रपटातील माझे गाणे ओ साकी साकी रिक्रिएट करण्यात आले आहे. सुनिधी चौहान, सुखविंदग सिंह, विशाल आणि शेखर यांची जुगलबंदी अफलातून होती. हे रिक्रिएट व्हर्जन मला आवडले नाही’ असे तिने ट्विटमध्ये लिहिले.

‘बाटला हाऊस’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

यामध्ये जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं त्यांची भूमिका जॉन साकारणार आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं याची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.