Advertisement

माझ्या बायकोचं नाव ‘जेनेलिया’ नाही; रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत

रितेशच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि क्यूट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ओळखले जातात. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आज ५ ऑगस्ट रोजी जिनिलियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. दरम्यान जिनिलियाचा पती रितेश देशमुखने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जिनिलिया तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहे. अनेकजण जिनिलियाला शुभेच्छा देताना तिचे नाव चुकीचे लिहित आहेत. ते पाहून रितेशन ट्वीट केले आहे. “माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे… जेनेलिया नाही” असे रितेश म्हणाला आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

रितेशने केलेल्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी जिनिलियाला शुभेच्छा दिल्या तर काहींना रितेशला उखाणा घ्यायला सांगितला आहे. एका यूजरने ‘हा खरा संघर्ष आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘घ्या मग उखाणा’ असे म्हटले आहे.

रितेशने सोशल मीडियावर जिनिलियाचा एक व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको… माझ्यासाठी या जगातील सर्वात स्पेशल व्यक्ती’ या आशयाचे कॅप्शन त्याने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

21
READ IN APP
X
X