बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. आज जरी तो आपल्यामध्ये नसला तरी त्याच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जीवंत आहेत. आज सुशांतचा ३५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे अनेक कालाकर आणि त्याचे चाहते भावूक होऊन पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान त्याची एक्स-गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुशांत स्कॉच म्हणजेच अंकिताच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. “सुरूवात कशी करू हे मला समजत नाही पण हो आज मी तुझे काही जुने व्हिडीओ तुझ्या आठवणीत शेअर करणार आहे. तुझ्यासोबतच्या फक्त याच आठवणी माझ्याकडे आहेत. स्कॉच नेहमीच तुझी आठवण काढायचा आणि आता तर मला वाटतं की त्याला तुझी खूप आठवण येते” या आशयाचे कॅप्शन अंकिताने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.
View this post on Instagram
अकिंताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत जादू तेरी नजर या गाण्यावर अभिनेता शाहरूख खान सारखा नाचत आहे. नंतर तो अंकितासोबत नाचत आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशांत. एसआरकेचा खरा चाहता. जिथे आहेस तेथे हसत राहा” अशा आशयाचे कॅप्शन अंकिताने त्या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
सुशांत आणि अंकिताची भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेदरम्यान झाली होती. त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. ६ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर २०१६मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.