13 November 2019

News Flash

‘फँड्री’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

देश विदेशातील प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचीही मने जिंकणा-या 'फँड्री' या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

| April 14, 2014 01:04 am

देश विदेशातील प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचीही मने जिंकणा-या ‘फँड्री’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ लॉस एन्जलीस’ महोत्सवात फँड्रीला ‘सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नावातूनच वेगळेपणा जपणा-या ‘फँड्री’ या चित्रपटाने यापूर्वीही मुंबईतील मामि चित्रपट महोत्सवात, बंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार पटकावले होते. शिवाय गोव्यातील ईफ्फी या चित्रपट महोत्सवातही आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. तसेच, १२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने तब्बल पाच पुरस्कार पटकावित पिफ पुरस्कारावर आपली ठसठशीत मोहर उमटवली. भारतीय प्रेक्षकांना फँड्रीची दाहकता भावलीच पण अमेरिका, कॅनडा, स्पेन, इराण, जर्मनी आणि मेक्सिकोमधुन आलेल्या मान्यवर परीक्षकांची मने जिंकण्यातही फँड्रीला यश मिळाले आहे.
‘फँड्री’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे याने फेसबुक पेजवर पुरस्कारासोबतचे छायाचित्र पोस्ट केले आहे.

First Published on April 14, 2014 1:04 am

Web Title: one more feather in fandrys cap