राष्ट्रीय पारितोषिक विजेता ठरलेल्या दिग्दर्शक राजेश पिंजानी आता निर्मात्या व सूत्रधाराच्या भूमिकेत दिसतील. इंटरनेट सराईत बनलेली तरुणाई आणि त्याभोवती फिरणारी ‘रोमॅण्टिक कॉमेडी’ ‘ऑनलाइन बिनलाइन’ हा पिंजानी यांच्यासह निर्माते श्रेयस जाधव यांचा नवा चित्रपट आहे.  चित्रपटाची संपूर्ण संकल्पना आणि दिग्दर्शन केदार गायकवाड यांचे आहे. ‘शोले’ चित्रपटातील जय आणि वीरू या व्यक्तिरेखांची दोस्ती ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या नव्या मराठी चित्रपटातही याच प्रकारची दोस्ती दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे आजचे आघाडीचे कलावंत चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारत आहेत.