News Flash

FACEBOOK LIVE CHAT : उर्मिला आणि क्रांतीशी ‘लाईव्ह संवाद’ साधण्याची संधी!

'करार' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने या दोघीही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर-कोठारे

‘लोकसत्ता’तर्फे आजवर नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. काळाची पावलं ओळखून संवादाच्या नवीन माध्यमांना ‘लोकसत्ता’ने नेहमीच आपलसं केलं आणि म्हणूनच वाचकांनीही त्याला भरघोस प्रतिसाद दिला. याच नवमाध्यामांची ताकद ओळखून आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याचे सुलभ साधन म्हणून लोकसत्ता ऑनलाइनतर्फे एक नवा नजराणा सादर करत आहोत. Loksatta.com तर्फे ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’ या नव्या उपक्रमा अंतर्गत ‘फेसबुकच्या व्हिडिओ चॅट’मार्फत विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि नामवंतांशी संवाद साधण्याचे नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यावेळी लोकसत्ता लाईव्ह चॅटमध्ये असणार आहेत अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कानिटकर- कोठारे. ‘करार’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने या दोघीही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

या हरहुन्नरी अभिनेत्रींसोबत संवाद साधण्याची संधी आम्ही तुम्हालाही देत आहोत. आपल्या आवडत्या अभिनेत्रींना प्रश्न विचारण्याची संधी आज दुपारी १२ ते १ या वेळेत तुम्हाला मिळणार आहे.

प्रश्न कसा आणि कुठे विचाराल?
* दुपारी १२ ते १ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/LoksattaLive) उर्मिला आणि क्रांतीसोबतच्या गप्पांचा व्हिडिओ लाइव्ह दिसेल. त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे. उर्मिला आणि क्रांती व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील.
* तुम्ही तुमचे प्रश्न ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजच्या ‘इनबॉक्स’मध्येही पाठवू शकता. सोबत तुमचे नाव आणि ठिकाणाची नोंद असणे गरजेचे आहे.
कधी : मंगळवार, १० जानेवारी २०१७
कुठे : लोकसत्ता फेसबुक पेज (www.facebook.com/LoksattaLive)
किती वाजता : दुपारी १२ ते १ यावेळेत.

‘करार’ चित्रपटाविषयी थोडेसे:
आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्या ‘करार’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर उलगडला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित ‘करार’ या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यास नेहमी तत्पर असलेला अभिनेता सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेतून दिसणार आहे. त्यांच्यासह उर्मिला कानिटकर आणि क्रांती रेडकर पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सुहासिनी मुळे आणि आरती मोरे या देखील या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. सिनेमा समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:14 am

Web Title: opportunity to have live chat with kranti redkar and urmila kanetkar kothare on loksatta live
Next Stories
1 सेलिब्रिटी क्रश : मला तो खूप रोमॅण्टिक वाटतो
2 अपर्णा सेन, सीमा देव यांना जीवनगौरव
3 कपिलच्या कार्यक्रमात योगासनांचा योग?
Just Now!
X