News Flash

PHOTOS : डोळ्यातून प्रेम व्यक्त करणारा ‘तो’ आहे तरी कोण?

जाणून घ्या प्रियासोबत झळकलेल्या त्या अभिनेत्याबद्दल

Manikya Malaraya Poovi
'मनिक्य मलरया पूवी'

बॉलिवूड, हॉलिवूड किंवा मराठी चित्रपटसृष्टी. कोणच्याही कलाविश्वाचे चाहते असाल तरीही आज या चाहतेपणाला कोणत्याच सीमा राहिलेल्या नाहीत. त्यातही सोशल मीडियावर तुमचा सततचा वावर असेल तर, मग तुम्हाला आतापर्यंत निदान एक दोन मल्ल्याळम कलाकारांची नावं माहित झालीच असतील. त्या नावांमध्ये प्रिया प्रकाश वरियर हे नावही हमखास असणार यात शंकाच नाही. तगड्या अभिनेत्रींच्या गर्दीत ही नव्या जोमाची अभिनेत्री येते काय आणि एका रात्रीत सर्वांच्या मनावर राज्य करते काय. अनपेक्षितपणे व्हायरल झालेल्या ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे प्रियाला असंख्य चाहत्यांची पसंती मिळाली.

‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यात प्रिया आणि तिच्यासोबत दिसणारा अभिनेता अवघ्या काही सेकंदांसाठी दिसत आहेत. पण, त्यांच्या नात्यातील खोडकरपणा आणि त्यातून झळकणारं प्रेम या गोष्टी नेटकऱ्यांच्या मनाला भावल्या आहेत. काहींनी तर प्रियाचे फोटो मोबाईल आणि लॅपटॉपवर स्क्रीनसेव्हर म्हणूनही ठेवले आहेत. प्रियाप्रमाणेच तिच्यासोबत दिसणारा ‘तो’सुद्धा सध्या प्रकाशझोतात आला आहे. तिच्या हसण्याने घायाळ झालेल्या त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून अनेकांच्या मनात काही आठवणीसुद्धा जाग्या झाल्या आहेत.

प्रियासोबत झळकणाऱ्या त्या अभिनेत्याविषयी फार माहिती उबलब्ध नसली तरीही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. मोहम्मद रोशन किंवा रोशन अब्दुल रहूफ या नावांनी तो ओळखला जातो. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय आहे. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला या गाण्याची आणि दोन्ही युवा कलाकारांची लोकप्रियता पाहता ‘उरु अदार लव्ह’ या आगामी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हं आहेत. शिवाय आता कलाविश्वात या दोन्ही कलाकारांना प्रेक्षक कुठवर साथ देतात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 6:09 pm

Web Title: oru adaar love song priya prakash varrier many drooling over the boy mohammed roshan know more about him
Next Stories
1 ‘साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे’
2 भाऊ कदमच्या ‘सायकल’ सिनेमाचा टीझर पाहिलात का?
3 VIDEO : ‘काला’तील स्टंट सीन लीक
Just Now!
X