News Flash

‘पद्मावत’ पाहण्याचा पत्नीचा हट्ट तर पतीला हवी सुरक्षेची हमी

पोलिसांना ट्विट करून मागितली सुरक्षेची हमी

दीपिका पदुकोण

महिलांचे हट्ट पुरवणे ही काही सोपी गोष्टी नाही, असं अनेकजण म्हणतात. गाझियाबादमधील एक व्यक्ती पत्नीच्या हट्टामुळे हैराण झाला आहे. तसं पाहिल्यास तिची मागणी काही मोठी नव्हती. संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचा हट्ट तिने केला. पण देशभरात करणी सेनेकडून प्रदर्शनाविरोधात सुरु असलेले आंदोलन आणि निदर्शने पाहता पतीने तिच्या मागणीचा धसकाच घेतला.

गाझियाबादमध्ये राहणाऱ्या संदीप सिंह यांनी सोमवारी रात्री ट्विट करून पोलिसांना आपल्या पत्नीची इच्छा सांगितली. त्यासोबतच कुटुंबियांच्या सुरक्षेचीही हमी पोलिसांकडे मागितली. त्याच्या या ट्विटवर पोलिसांनीही उत्तर दिले. ‘तुम्ही निश्चिंत होऊन चित्रपट पाहायला जा. गाझियाबाद पोलीस तुम्हाला सुरक्षा पुरवेल,’ असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच्याविरोधात करणी सेना दंड थोपटून उभी आहे. काही चित्रपटगृहांची तोडफोडही करणी सेनेकडून करण्यात आली असून प्रेक्षकांमध्ये याची भिती निर्माण झाली आहे. याच भितीमुळे संदीप सिंह यांनी पोलिसांकडे सुरक्षेची हमी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:15 pm

Web Title: padmaavat row husband asks for police security as wife wants to see first day first show
Next Stories
1 …तर करण जोहर तुरुंगात जाऊ शकतो
2 PHOTOS : ‘पद्मावत’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दीपिकाला मिळाली रणवीरची साथ
3 सोनिया गांधींच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ परदेशी अभिनेत्री
Just Now!
X