News Flash

अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने घेतलं सुंदर वळण

“पाहिले न मी तुला” मालिकेत नवे वळण

या जगात किंवा आपल्या अवतीभवती अशी अनेक उदाहरणं आहेत, अशी अनेक जोडपी आहेत त्यांनी खऱ्या प्रेमाखातर घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केलं. आपला वेगळा संसार मांडला आणि तो संसार यशस्वीपणे चालवत आहेत. असाच काहीसा अनिकेत आणि मनूचा संसार. प्रेमाखातर घरच्यांपासून लपवून लग्न केलं आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर वळण घेतलंय. नुकताच एकमेकांच्या साथीने संसाराचा श्री गणेशा त्यांनी केला आहे. घरच्यांनी जरी मनापासून त्यांच्या लग्नाला स्वीकारलं नसलं तरी अनिकेत मनूने आशा सोडली नाहीये. त्यांना विश्वास आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे.

अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. ते लहानसे का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. मनूच्या मनातल्या इच्छा तिने सांगण्याआधीच अनिकेत पूर्णत्वास येतील असा प्रयत्न करणार आहे. अनिकेतच्या या सगळ्या धडपडीचं मनूला फारच कौतुक आहे. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे.

पण या गोष्टीमुळे अपमानित, सैरभैर झालेला व मानसीसाठी ईर्षेला पेटलेला समर, अनिकेत आणि मनूचा संसार सुखी होऊ देईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण  “पाहिले न मी तुला” मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 5:39 pm

Web Title: pahaile na me tula serial update avb 95
Next Stories
1 ‘धक्कादायकच, कारण…’, अमित कुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
2 Video : प्रँक करताना अनिता हसनंदानीने पतीच्या लगावली कानशिलात, सोशल मीडियावर झाली ट्रोल
3 अनिल कपूरने शेअर केली नवी फिटनेस पोस्ट; नीना गुप्ता म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात’
Just Now!
X