News Flash

Pulwama Attack : ‘हिंदी मीडियम’ च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची गच्छंती?

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट ठरला होता.

पुलवामा हल्ल्याचा बॉलिवूडनं जोरदार निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ घेतला आहे. तर दुसरीकडे ‘हिंदी मीडियम’ च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची गच्छंती केली असल्याचंही समजत आहे.

सबा कमर इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ मध्ये झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या कथेबरोबरच सबाचंही भरभरून कौतुक प्रेक्षकांनी केलं होतं. मात्र सबाला ‘हिंदी मीडियम’ च्या सीक्वलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सबाऐवजी राधिका आपटे किंवा राधिका मदन या दोन अभिनेत्रीची वर्षी चित्रपटासाठी लागू शकते.
राधिकाला या चित्रपटात इरफान खानच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आहे. या चित्रपटासंदर्भात अधिकृत घोषणा व्हायची आहे. गेल्या वर्षभरापासून अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावली असल्यानं तो परदेशात उपचार घेत होता. सध्या इरफान मुंबईत उपचार घेत आहे. उपचारानंतर इरफानला किमान वर्षभराची विश्रांती सांगण्यात आली आहे. त्यामुळे ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलला दिरंगाई होणार हे नक्की!

पण तूर्त सबा या चित्रपटाचा भाग नसणार असं म्हटलं जात आहे. तसेच हिंदी मीडियम’च्या सीक्वलचं नाव बदलून ते इंग्लिश मीडियम करण्याचा विचारही निर्मात्यांचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 5:23 pm

Web Title: pakistani actress saba qamar will not be part of hindi medium sequel
Next Stories
1 Pulwama Attack : आमच्यासाठी देश पहिला, ‘AICWA’ ची पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
2 पाकिस्तानी गायकांची गाणी बंद करा, अन्यथा ‘सर्जिकल स्ट्राइक’, मनसेचा FM वाहिन्यांना इशारा
3 प्रेक्षकांना भावेल अभिज्ञा भावेचा ‘सूर सपाटा’
Just Now!
X