28 September 2020

News Flash

Video : अखेर इरफान खानवर विनोद करणाऱ्या पाकिस्तानी सूत्रसंचालकाने मागितली माफी

व्हिडीओ शेअर करत त्यांनी माफी मागितली आहे.

‘जीवे पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या लाइव्ह चॅट शोमध्ये दिवंगत अभिनेते इरफान खान आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर करण्यात आलेल्या विनोदामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा सुरु आहेत. या शोमध्ये त्यावेळी उपस्थित असणारे पाकिस्तानी अभिनेते अदनान सिद्दिकी यांनी सोशल मीडियाद्वारे माफी मागितली होती. आता शोचे सूत्रसंचालक आमिर लियाकत साहब यांनी माफी मागितली आहे.

आमिर लियाकत साहब यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. ‘माझ्या शोमध्ये काही गोष्टी अशा झाल्या की त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. कधी कधी लाइव्ह शोमध्ये आपल्या तोंडून अनेक गोष्टी निघून जातात. त्यावेळी ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. पण नंतर माझ्या लक्षात आले की ही गोष्टी व्हायला नको होती. मी तुमची माफी मागतो. मी असे बोलयला नको होते. मी तुमच्या सर्वांची माफी मागतो’ असे ते म्हणाले.

‘एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माफी मागणारा नेहमी मोठा असतो. एखाद्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली तर समोरच्या व्यक्तीने मोठ्या मनाने त्याला माफ करावे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानी अभिनेते अदनान सिद्दिकी यांनी इरफान खान आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम केले आहे. पण शोमध्ये शोचे सूत्रसंचालक आमिर लियाकत साहब यांनी बॉलिवूडच्या दिवंगत कलाकारांवर विनोद केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर केली जात होती. ‘अदनान यांनी ज्या ज्या कलाकारांसोबत काम केले त्या कलाकारांनी आज जगाचा निरोपा घेतला आहे. इतकच नव्हे तर अदनान यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’या चित्रपटातील भूमिका नाकारल्याने त्यातील कलाकारांचे प्राण वाचले’ असे आमिर यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 3:33 pm

Web Title: pakistani show host apologize after joke on late bollywood actor irrfan khan avb 95
Next Stories
1 Video : ‘तारक मेहता’ मधील ‘बापूजीं’चे भांडी घासण्यावरुन भांडण, पाहा मजेशीर व्हिडीओ
2 चाहत्याच्या प्रश्नाला अरुण गोविल यांचं उत्तर; सांगितलं कसं टळणार करोनाचं संकट
3 उत्तर रामायणाचा शेवटचा भाग पाहून प्रेक्षक झाले भावूक
Just Now!
X