News Flash

लग्नाच्या एक महिन्यातच अभिनेत्याच्या नात्यात पडली फूट? पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

१९ जून रोजी त्यांचे लग्न झाले आहे.

(PHOTO CREDIT : akshay_kharodia instagram)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘पांड्या स्टोर.’ या मालिकेत काम करणारा अभिनेता अक्षय खरोडियाने १९ जून रोजी गर्लफ्रेंड दिव्या पुनेठाशी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दरम्यान अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही पोस्टपाहून अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट पडली असल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत ‘Heartbroken’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवरुन लग्नाच्या महिनाभरातच अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट तर पडली नाही ना असे म्हटले जात आहे.

pandya store, Akshay Kharodia Marriage In Trouble, akshay kharodia divya punetha marriage,

अक्षयने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान अक्षयने दिव्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे देखील बंद केले आहे. सध्या अक्षयची ही पोस्ट चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kharodia (@akshay_kharodia)

१९ जून रोजी अक्षयने डेहराडून येथे दिव्याशी लग्न केले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या लग्नाला केवळ १० लोकांनी हजेरी लावली होती. लग्नातील अक्षय आणि दिव्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दिव्या ही एक डॉक्टर आहे. पण आता त्यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 2:29 pm

Web Title: pandya store actor akshay kharodia divya punetha marriage in trouble avb 95
Next Stories
1 ‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल
2 ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
3 आयुषमान खुराना पडद्यावर दिसणार नव्या भूमिकेत; आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल
Just Now!
X