लॉकडाउनच्या काळात अनेक जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू झाल्या आहेत. आता त्यात ‘बिग बॉस मराठी २’ या रिअॅलिटी शोचीही भर पडली आहे. येत्या रविवारपासून हा रिअॅलिटी शो पुन्हा प्रक्षेपित करण्यात येत आहे. या दुसऱ्या सिझनमधील स्पर्धक व सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे मात्र यामुळे चिंतेत आहे. त्याच्या चिंतेचं कारण म्हणजे, हा शो मी पत्नीसोबत कसा बघू? ‘बिग बॉस मराठी २’मध्ये पराग कान्हेरे व रुपाली भोसले ही जोडी चांगलीच चर्चेत होती. मात्र ते फक्त शो पुरतं राहिलं. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच परागने मुक्ता भातखंडेशी लग्नगाठ बांधली.

परागने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ही चिंता बोलून दाखवली. ‘बिग बॉस मराठी २ पुन्हा दाखवण्यात येणार आहे. माझ्या पत्नीच्या बाजूला बसून हे सर्व एपिसोड पुन्हा पाहण्याची मला भीतीच वाटतेय. देवा वाचव मला’, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलंय. परागची ही भीती पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालंय.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
chandrashekhar bavankule raj thackeray marathi news
मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

 

View this post on Instagram

 

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

आणखी वाचा : कधीच प्रदर्शित होऊ न शकलेल्या चित्रपटातील ऐश्वर्या रायचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पराग हा ‘बिग बॉस मराठी २’मधला सर्वांत चर्चेतला स्पर्धक होता. नेहा शितोळेवर हात उगारल्याप्रकरणी त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. यावर त्याने आक्षेपसुद्धा घेतला होता.