News Flash

मुव्ही रिव्ह्यू : व्हेगनचा’ ट्रेंड आहे जोरात… म्हणून आली प्रयोगशील लग्नवरात

‘शाकाहारी की मांसाहारी?’... असा प्रश्न तुम्ही कधी कोणत्या रिक्षावाल्याला विचारला आहे का?

मुव्ही रिव्ह्यू : व्हेगनचा’ ट्रेंड आहे जोरात… म्हणून आली प्रयोगशील लग्नवरात
Chi Va Chi Sau Ka, ‘चि. व. चि. सौ. कां.’, ललित प्रभाकर , मृण्मयी गोडबोले

‘शाकाहारी की मांसाहारी?’… असा प्रश्न तुम्ही कधी कोणत्या रिक्षावाल्याला विचारला आहे का, .. अहो असं कुणी विचारतं का.. हे म्हणण्यापूर्वीच असं पात्र खुद्द दिग्दर्शक परेश मोकाशी तुमच्या भेटीला घेऊन आले आहेत. मराठी कलाविश्वातील काही नावाजलेले चेहरे परेश- मधुगंधाच्या या प्रयोगशील लग्नवरातीत सहभागी झाले आहेत.

लग्नसराईच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही भन्नाट कुटुंबं आणि त्यातली तऱ्हेवाईक पात्र अनेकांची मनं जिंकत आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्राण्यांची डॉक्टर असणारी आणि प्राणिप्रेमाचा जरा जास्तच ध्यास घेतलेली ‘सावित्री’ (सावि), आणि सोलारपुत्र या नावाला सार्थ ठरणारा ‘सत्यप्रकाश’ (सत्या) यांच्या पहिल्या भेटीपासून सुरु झालेला हा प्रवास बऱ्याच गोष्टींनी, कलाकारांनी, शाब्दिक विनोद आणि कलाकारांच्या अफलातून अभिनयाने सजलेला आहे. मृण्मयी आणि ललितच्या अभिनयाविषयी सांगावं तर फार ग्रेट नाही, पण फार वाईटही नाही, असा त्यांचा अभिनय आहे. दोघांच्याही कुटुंबाचं चित्रण करताना त्यात टिपलेले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. त्यातही ‘सावि’ आणि ‘सत्या’च्या कुटुंबातील सदस्य म्हणजे क्या बात. या सर्वांमध्ये ‘सावि’चा भाऊ, ‘टिल्या’ बरंच फुटेज खातो… अर्थात त्याच्या अभिनयाची दाद द्यावी तितकी कमीच आहे.

‘सावि’ म्हणजेच सावित्रीच्या लहान भावाप्रमाणेच आणखी एक पात्र या चित्रपटातून आपल्या भेटीला येतं ते म्हणजे भारत गणेशपुरे यांनी साकारलेल्या ‘निवेदका’चं. ‘देवेंद्र वसंत ब्रह्मे’ म्हणजेच ‘दे.व. ब्रह्मे’ यामध्ये अधूनमधून चित्रपटाच्या कथानकासोबत प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचं सुरेख काम करत आहेत.

चित्रपटातील काही दृश्यांमध्ये उगाचच पात्रांच्या वरच्या पट्टीतले आवाज कानठळ्या बसवतात. पण, पुढच्याच क्षणी हे सर्व काही पूर्वपदावर येतं. ललित साकारत असलेल्या सोलारपुत्राच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती सुभाष म्हणजे ‘वाढतं वय’ आणि ‘आजी’ या दोन्ही शब्दांना लाजवणाऱ्या हे इथंही सिद्ध होत आहे.

चित्रपटातील संवाद आणि त्यातून होणारी विनोदनिर्मिती यांचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे. पण, एकदा विचार करावाच लागतो की, कोणी खरंच एखाद्या गोष्टीचा इतका ध्यास घेऊ शकेल का…? आणि घेतला तर मग त्याची काय अवस्था असेल याचं चित्रण म्हणजे चि. व चि. सौ. का.
दिग्दर्शक- परेश मोकाशी
निर्माते- निखिल साने
लेखन- परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी
कलाकार- ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, ज्योती सुभाष, भारत गणेशपुरे आणि इतर…

सायली पाटील, sayali.patil@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 8:16 am

Web Title: paresh mokashi directed lalit prabhakar mrinmayee godbole chi va chi sau ka marathi movie review
Next Stories
1 खोडकर आणि नकलाकार नयन अजून स्मरते..
2 कहाणी अधुरीच राहिली..
3 Fu Marathi Movie: मांजरेकरांच्या ‘एफयू’ला ‘झी’चा ‘धडा’
Just Now!
X