जेष्ठ अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे नेत परेश रावल यांनी महिलेने केलेल्या आरोपाला विनोदी बुद्धीने फिल्मी शैलीत प्रत्त्युत्तर दिले. ‘मॅडम कपाळावर येणारे केस बाजूला करुन पाहा’ म्हणजे बातमीतील सत्य कळेल असे रावल यांनी म्हटले आहे. परेश रावल यांनी केलेल्या एका ट्विटवर पर्मिला नावाच्या महिलेने आक्षेप नोंदविला होता. परेश रावल यांनी मंगळवारी दिव्यांग सैनिकांच्या पेन्शन संदर्भात ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी दिव्यांग सैनिकांची पेन्शन कमी करावी, या वृत्ताचे खंडन केले होते. परेश रावल यांच्या या ट्विटनंतर पर्मिला नावाच्या महिलेने परेश रावल यांच्यावर निशाणा साधला. ही बातमी तुमच्या पत्रकाराकडून मिळाली असावी, असे सांगत त्यांनी रावल यांचे ट्विट खोट असल्याचे सांगून दिले. दिव्यांग सैनिकांच्या पेन्शनच्या मुद्यावरुन महिलेने मारलेल्या टोमण्याला परेश रावल यांनी फिल्मी शैलीत उत्तर दिले. मॅडम आपल्या कपाळावरील केस बाजूला करुन पाहा, असे म्हटले. आपल्या ट्विटची सत्यता दाखवून देण्यासाठी त्यांनी सरकारने लष्कराच्या वेतनसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची लिंक देखील ट्विटरवरुन शेअर केली.

सरकार दिव्यांग सैनिकांची पेन्शन कमी करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून झळकत होते. मात्र सोमवारी सरकारने या वृत्ताचे खंडन केले होते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, ९० टक्के सैनिकांच्या वेतनात वाढ केरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे दिव्यांग सैनिकांच्या पेन्शनमध्ये देखील १४ ते ३० टक्के वाढ होणार आहे.