स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सर्व बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु परिणातीने १५ ऑगस्ट रोजी शुभेच्छा देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीतीच्या या ट्विटमूळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
परिणीतीने थोड्या अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पाण्यात झेंडा फडकवल्याचा व्हिडीओ ट्विटरवर शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत परिणीतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ मे महिन्यातील असून यामध्ये परिणीतीचा कथित बॉयफ्रेंड चरित देसाई पाण्याच्या आत भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे. परिणीतीने हा व्हिडीओ शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
एका चाहत्याने परिणीतीला ‘दीदी काल होता स्वातंत्र्य दिन’ असे म्हटले आहे.
Happy Independence Day! we hoisted our flag a little differently back in May 🙂 @charitdesai #ChinmayaSharma #RakeshScuba pic.twitter.com/0sWnaQskQz
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) August 16, 2019
Didi kal tha
— Arun Singh (@MrArun_Singh) August 16, 2019
But today is 16
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Jackson Chakma (@jackchakm) August 16, 2019
aaj kaun sa independence day hai pari
— (@ra_abx) August 16, 2019
सध्या परिणीती तिचा आगमी चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु असल्याचे म्हटले जात आहे. परिणीतीचा हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या मिस्ट्री थ्रिलर हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.