01 March 2021

News Flash

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. अण्णा नाईक, शेवंता, पांडू या सर्व व्यक्तिरेखांसोबत पाटणकर ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली. पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपालसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘नेलपॉलिश’ या चित्रपटाबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधिश म्हणाला, “कायद्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून ‘शेड्स ऑफ लॉ’ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांना पहायला मिळतील. या चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी, रजित कपूर यांसारख्या कलाकारांबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.”

अभिनयाची आवड जोपासण्यासाठी अधिक्षने इंजिनिअरिंगची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘एक रिकामी बाजू’, ‘बेईमान’, ‘मी रेवती देशपांडे, ‘आषाढातील एक दिवस’, ‘हॅम्लेट’ तसेच स्वत: लेखन आणि अभिनय केलेलं ‘कसाब आणि मी,’ ‘संगीत हमीदाबाईची कोठी’, ’धुवान’, ‘अपराधी सुगंध’, ‘प्राईस टॅग’ यांसारख्या नाटकांसोबत ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’ चित्रपटांमध्ये सुद्धा अधिशने अभिनय केला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये झळकलेल्या अधिशने ‘स्त्रीलिंगी –पुल्लिंगी’ या वेब सीरीजमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 6:30 pm

Web Title: patankar aka adhiksh paygude from ratris khel chale to debut in bollywood through nailpolish movie ssv 92
Next Stories
1 प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा सोफ्यावरील रोमॅण्टिक फोटो आणि…
2 ‘नक्सलबाडी’ वेब सीरिजला प्रेक्षक-समीक्षकांची पसंती
3 ‘कॉन्ट्रॉव्हर्सी केली पण कधी.. ‘; बिग बॉसमध्ये राखी सावंत व्यक्त
Just Now!
X